IMD Issues Red Alert For City For Next 3 Hours, Intense To Very Intense Rainfall Predicted

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट' जारी केला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडी मुंबईनं दिलेल्या इशाऱ्यानुसार शहरात ताशी 30- 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना सावधगिरीचा इशाराही जारी करण्यात आला आहे
पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे सेवा उशिराने धावत आहे, ज्यामुळे सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहेत.
मध्य रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे, तर हार्बर लाईनवरील गाड्याही 7 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला असून, या मार्गावरील गाड्या 5 मिनिटे उशिरा धावत आहेत.
What's Your Reaction?






